पुणे I झुंज न्यूज : गिरीश कुबेर यांनी रीनैसंस स्टेट – द अनरिटन स्टोरी आॅफ द मेकिंग महाराष्ट्र. या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांचा खून केला. तसेच शाहू महाराजांना दुरदृष्टीचा अभाव असणारे व कृर्तृत्व नसणारे छत्रपती होते. महादजी शिंदेंना तर विश्वासघातकी, दगाबाज होते. अशा पध्दतीचे अत्यंत आक्षेपार्ह लिखाण या पुस्तकात पानोपानी केले आहे.
गिरीश कुबेर याचेवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी दिनांक २५ जून रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर डांगे चौक थेरगाव येथे गिरीश कुबेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात करून त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.