हिंगणघाट I झुंज न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त जंगल पदभ्रमण करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. निसर्ग साथी फाऊंडेशनकडून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला होता.
“ सहभागी सर्व भ्रमणवीरांना नीलगाय (blue bull) ,स्वर्ग नाचन (paradise flycatcher ), राखाडी धनेश (Grey Hornbill ) ,नवरंग (Indian pitta), भारद्वाज (Grater Cokal), छोटी अंगारक (Small Minivet), गोसावी (Red bug), कोळी (spider) यासोबतच काही पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. त्याच प्रमाणे काही पक्षी उन्हाळ्यात स्थलांतर करून आपल्या भागात येतात. इथे घरटी करून पिलांना घेऊन परत जातात. या उन्हाळी प्रवासी पक्षाची घरटी पाहण्याची संधी पदभ्रमण दरम्यान मिळाली. तसेच गोसावी म्हणून ओळख असलेलं Red bug हे कीटक पाहून अनेकांना आपल्या बालपणाची आठवण झाली.
जोर कडू या बालविद्यार्थीनीने हिरवा शिकारी कोळी या दुर्मिळ जाती कडे सर्वांचे लक्ष वेधले. तसेच जंगलातील झाडांची माहिती सुध्दा घेऊन त्यांचे निरीक्षण करण्यात आले. या पदभ्रमण कार्यक्रमात प्रविण कडू, जितेंद्र केदार, गुणवंत ठाकरे, नियजुद्दीन सिद्दीकी, मनोज बोकडे, राकेश झाडे, परीक्षित ढगे, प्रगती बोकडे, भावना चाफले, अंजोर कडू इत्यादी सहभागी झाले होते.