चिखली | झुंज न्यूज : चिखली येथील उषा विक्रम छाजेड यांच्या रेशन दुकानात ग्राहकांना धान्य वाटप कश्या पद्धतीने चालु आहे. दुकानदार ग्राहकांशी कसे वर्तन करतात. मोफत धान्य दिले जाते का. पैशाची मागणी केली जाते का. नागरीकांना काही अडचणी आहेत का याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच ग्राहकांशी संवाद साधला.
“फ” परिमंडल आधीकारी गजानन देशमुख, तसेच नगरसेवक दिनेश यादव, पुरवठा निरीक्षक बबन माने, यांनी दुकानाला भेट देत ही पाहणी केली व कार्डधारकांशी संवाद साधला.