चिंचवड I झुंज न्यूज : थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोरील एका केमिकल कंपनीत मॅग्नेशियम पावडरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता कि सिमेंटच्या भिंती तुटून पडल्या. या स्फोटाने कंपनी उध्दवस्थ झाली तर परिसर हादरून गेला आहे. आजूबाजूच्या अनेक घरांना तडे गेले असून अनेक दुकानाचं नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही तर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. आगीचा भडका तीव्र झाल्याने काही दुर्घटना घडू नये यासाठी बिर्ला हॉस्पिटल जवळून वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
“मिळालेल्या माहितीनुसार, पदमजी पेपर मिलच्या पुढील बाजूस छोटी केमिकल कंपनी आहे. या केमिकल कंपनीत मॅग्नेशियम पावडरचा स्फोट झाला. घटनास्थळी पिंपरी अग्निशमन दलाच्या २, रहाटणीतील १ आणि प्राधिकरण येथील १ असे चार बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत आहे. आगीचा तांडव सुरू असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शरतीचे प्रयत्न सुरूच आहेत.
अग्निशामक दलाचे किरण गावडे म्हणाले,
पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केल्यास पावडर पेट घेऊन आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा वापर न करता वाळू व माती मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ट्रक इत्यादीच्या साह्याने वाळू व माती मागवण्यात आली आहे. मात्र स्फोट सुरूच असल्याने वाळूचा मारा करून आग विझवण्यात अडथळे येत आहेत. केमिकल असल्याने आग सुरूच आहे.
धमाक्याचा आवाज चार किलोमीटरपर्यंत आवाज
सैन्य दलाकडील दारुगोळा व फटाके तयार करण्यासाठी मॅग्नेशिअम पावडरचा वापर होतो. ती पावडर थेरगाव येथील कंपनीत तयार केली जात होती. शनिवारी कामगार काम करीत असताना अचानक आग लागली. त्यामुळे कामगार लागलीच सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यानंतर कंपनीत सोटांची मालिका सुरू झाली सायंकाळी साडेपाचपर्यंत स्फोट सुरूच होते. काही स्फोट मोठ्या तीव्रतेचे होते. त्यांच्या धमाक्यांचा आवाज चार किलोमीटरपर्यंत गेला.