माहिती मिळाल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
शिरूर I झुंज न्यूज : शिक्रापूर येथून लग्नाच्या दोन दिवस आधीच सागर अशोक ढमढेरे (वय ३५) हा युवक बेपत्ता झाला झाला आहे. बेपत्ता युवकाच्या भावाने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
शिक्रापूर येथील सागर ढमढेरे याचे १ एप्रिल २०२१ रोजी लग्न होते. मात्र, सागर याच्यावर शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्याचेवर उपचार घेण्यासाठी तो त्याचा भाऊ विशाल याच्या सोबत ३० मार्च रोजी गावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेला होता. त्यांनतर पुन्हा येत असताना त्याने त्याचा भावाला चौकात सोडण्यास सांगितले. त्यानंतर बराच वेळ सागर घरी आला नाही. शिवाय, त्यानंतर त्याचा मोबाईल बंदच होता.
सागरचा भाऊ विशाल अशोक ढमढेरे (रा. शिक्रापूर विठ्ठलमंदिर जवळ ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे भाऊ बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली आहे. बेपत्ता सागरचे वर्णन (वय ३५) अंगात पांढऱ्या रंगाचा फुलांच्या नक्षीचा शर्ट, निळी जीन्स प्यांट, उंची पाच फुट आठ इंच, रंग सावळा, उभट चेहरा, दाढी कोरलेली, पायात स्यांडल असे आहे.
सदर युवकाबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९६६५५८४८३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.