पिंपरी | झुंज न्यूज : कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या महापालिकेच्या कामगारांच्या वारसांना सानुग्रह धनादेश मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जील्हा युवा अध्यक्ष अजिंक्य दिलिप बारणे यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या १३ महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अदा करण्यास आज स्थायी समितीने मंजूरी दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या २३ कर्मचा-यांचा कोरोना बाधित होऊन मृत्यू झाला. यातील १३ कर्मचा-यांच्या वारसांना विमा योजनेनुसार २५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जावे यासाठी बारणे यांनी पाठपुरावा केला होता.
मृत पावलेल्या कर्मचा-यांमध्ये
अनंत काळबांटे,
हनुमंत वाडेकर,
मारुती शेडगे (मजूर),
शोभा भुजबळ (स्टाफनर्स),
ज्ञानेशर जाधव (वॉर्डबॉय),
भालचंद्र राऊत (एमपीडब्लू),
मोहम्मद शेख (लिफ्टमन),
सिध्दार्थ जगताप (उपलेखापाल),
तानाजी धुमाळ,
तायप्पा बहिरवाडे (रखवालदार),
संभाजी पवार (शिपाई),
अनिल ठाकूर (क्लिनर),
साईनाथ लाखे (कार्यालयीन अधिक्षक)
यांचा समावेश आहे. यांच्या वारसांना विमा रक्कम दिली जाणार आहे. तसेच उर्वरित १० कर्मचा-यांच्या वारसांनादेखील विमा रक्कम देण्याचे प्रस्तावित आहे.