शिरूर I झुंज न्यूज : कसाईच्या तावडीतून गोमातेच्या मानेवरील सूरी वाचविण्यासाठी तसेच संपुर्ण महाराष्ट्र गोहत्त्या मुक्त करण्यासाठी श्री शिव छत्रपती गोरक्षा अभियान गेली वर्षभर प्रयत्न सुरु केले असुन प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त प्रतिदिन आम्हाला फक्त १ रुपयाप्रमाणे ३६५ रुपये द्या, आम्ही तुम्हाला गोहत्त्यामुक्त असा महाराष्ट्र देऊ, असे आव्हान या अभियानाचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी तसेच सर्व देवदेवतांचे दर्शन गाईकडे पाहून होते, अशी भावनां असलेली व हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान असलेल्या गाईंची चोर मार्गाने मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होत असुन या गाई कत्तल खान्यात पाठवल्या जातात. महाराष्ट्रात गोतस्कर धंदा चोरी-चुपके होत असुन कायद्याचा त्यावर पाहिजे तसा धाक राहिलेला नाही. कत्तलीसाठी जाणाऱ्या गाई वाचवता येतील, त्या वाचवून गोशाळेत पाठविल्या जाणार आहेत.
समाज जागृती करुन गोधन वाचविले तर सृष्टी वाचेल परिणामी देशही वाचेल, ही संकल्पना घेऊन वरील संस्था केवळ गोमाता वाचविण्यासाठी महाराष्ट्रात हे अभियान राबवित आहे. यासाठी प्रत्येक हिंदू नागरिकांनी एक रुपया गोधन वाचविण्यासाठी चॅरिटी करावा, अशी विनंती एकबोटे यांनी समस्त देशवासीयांना केली आहे.
दान म्हणू आत्तापर्यंत साडेपाच लाख रुपये निधी संस्थेकडे प्राप्त झाला असुन गोरक्षकांना तो देण्यातही आला आहे. हा खर्च व जमा तपशील आम्ही फेसबुकवर प्रसिद्ध करीत असुन नागरिकांना माहितीसाठी व्हाट्सअपद्वारेही दिली जात आहे. मदतनिधी बँक खात्यामध्येही जमा करु शकता. आद्यरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा अभियानचे खात्याचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्यय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे, बँकेचे नाव – जनता सहकारी बँक ली. पुणे, शिवाजीनगर शाखा, खाते नंबर- ००२२२०१०००४०२४४ , आयएफसी क्रमांक- JSBP0000002 असा आहे.