पिंपरी | झुंज न्यूज : जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून मागील वर्षभरात लॉकडाऊनमध्ये जनसामान्यांना रोजगाराविषयी आणि आरोग्य विषयक रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या (Elements Wellness On & On Brand) या आयुर्वेदिक औषधोपचारांचा प्रचार करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार लाईफ स्टाईल संस्थेच्या पुणे विभागातील नॅशनल लेव्हलला कार्य पाहणाऱ्या एन . टी. सी. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख सौ. अर्चना दीघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम घारे शास्त्री हॉल चिंचवड येथे दिनांक ०८ मार्च २०२१ रोजी संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील जनसामान्य होतकरू महिलांना सोशल डिस्टंसीगमध्ये आयुक्तींनी आखून दिलेल्या संख्येने होत्या. प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध व्हावा तसेच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करता यावा हिच माय लाईफ स्टाईल संस्थेच्या भूमिका असल्याचे मत प्रमुख मान्यवर अर्चना दीघे यांनी कार्यक्रमात व्यक्त केले .
माय लाईफ स्टाईलच्या वतीने पंतप्रधान कौशल्य विकास योजना (Skills India) व्दारे स्वतःची कला कौशल्य दाखवून महिलांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय कसा निर्माण करावा, घरातील आर्थिक गणित कशाप्रकारे सांभाळावे, आरोग्य कसे अबाधित ठेवावे या बाबतची मान्यवरांनी मागदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अनुभवी महिला रोहिणी भालचिम, सोनाली कांबळे, सुनीता बांबळे, सविता जाधव, तृप्ती गटने, रेखा गायकवाड, सुनीता विश्वकर्मा, या अनुभवी महिलांनी, आपले घर संसार सांभाळून दररोज रोजगार कसा निर्माण करता येऊ शकतो याचे भाष्य करत कामाचा अनुभव आपल्या शब्दात मांडला.
पुढील वर्षी जून व्यापक स्वरूपात महिलांच्या कौतुकास्पद कार्याचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्ताने करण्यात येईल असे यावेळी माय लाईफ स्टाईलचे एन . टी. सी. सौ. अर्चना दीघे मॅडम यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महिलांचा आर्थिक, बौद्धिक, आत्मविश्वास वाढविण्याचे अप्रतिम कार्य केले. त्यांच्या भाषणातून स्वानुभवातून मांडण्याचा प्रयत्न केला, तसेच महिलांनी कोणत्याही आर्थिक अडचणीच्या काळात स्वबळावर कसे उभे राहता येऊ शकते. हे त्यांनी आपल्या शब्दात मांडले .
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना एकत्रीत करण्याचा एकच प्रामाणिक उद्देश असा होता कि सर्व सामान्यांना आरोग्य आणि रोजगार उपलब्ध करून देणे की ज्या मुळे महिलांना कायम स्वरूपी आर्थिक अडचणींना तोंड देता येऊ शकते . असे मत आयोजकांनी व्यक्त केले.