पुणे I झुंज न्यूज : बिबेवाडी येथील राव नर्सिंग होम मधील डॉक्टर, नर्स आणि मावशी यांना “जागर स्त्री शक्तीचा” या उपक्रमा अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त “कोरोना वारीअर्स” पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागातर्फे हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष प्रिया बेर्डे आणि उपाध्यक्ष अमर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख धनंजय वाठारकर, जिल्हा संघटक शैलेश परदेशी, अभिनेते, निवेदक आणि जिल्हा संघटक सांस्कृतिक विभाग आनंद खुडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी झुंज न्यूज चे उपसंपादक प्रसाद वडघुले, इंटरनॅशनल फोटोग्राफर गणेश गुरव, दिग्दर्शक सतीश सूर्यवंशी, फोटोग्राफर अक्षय शिंदे, अभिनेत्री मयुरी निंबाळकर, अभिनेत्री वैष्णवी जैस्वाल, गायक शिवम धर्माधिकारी, छत्रपती संभाजी या महानाट्यात लहान संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे बाल कलाकार प्रेम धर्माधिकारी, तसेच हॉस्पिटल मधील स्टाफ स्वप्नील पवार, महेश सोमनवार, जगदीश गर्दास, मंगेश घोडेराव, संदीप धर्माधिकारी उपथित होते.
“गायक शिवम धर्माधिकारी यांच्या श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत मधुर गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच त्यांनी कोरोना काळात सामान्य नागरिक घरात सुरक्षित राहावेत यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणाऱ्या नर्सिंग होम मधील नारी शक्तींसाठी “खुदा तो नही पर खुदा से हो तुम” हे गाणे म्हणत आभार व्यक्त करत उपस्थितांचे मन जिंकले. तर आनंद खुडे यांनी डॉक्टर, नर्स, आणि मावशी यांच्याशी गेम्स खेळत मनोरंजन केले.
आमच्या नर्सिंग होम मधील डॉक्टर, नर्स, मावशी यांचा कोरोना वारीअर्स म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान होत असल्यामुळे आम्हाला अभिमान वाटत आहे.” तसेच त्यांना यातून काम करण्याची जिद्द व प्रेरणा मिळेल असे मत स्टाफच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप धर्माधिकारी यांनी केले तर अभिनेते व निवेदक आनंद खुडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
“कोरोना वारीअर्स” पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे
डॉक्टर
डॉ. पल्लवी पाटील
डॉ. पुष्पांजली कुंभार
डॉ. पूजा लिमण
नर्सेस
सिस्टर. विजयी मोल
सिस्टर. राजश्री पालवे
सिस्टर. स्वप्नाली सुपनेकर
हाऊस किपींग
सिंधू खुटवड
अलका बाबर
जयश्री शिंदे
इतर विभाग
स्नेहा आफळे
हॉस्पिटल व्यतिरिक्त
माया धर्माधिकारी (चित्रपट महामंडळ आरोग्य विभाग)