चिंचवड I झुंज न्यूज : स्पार्क स्पोर्टस् जांभे क्रिकेट अकॅडमी यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पार्क अंडर १३ पुणे कप वन डे चँम्पीयनशिप स्पर्धेत व्हेरॉक-वेंगसकर अकडमीचा दोन विकेट्स राखून फ्रेंडस अकॅडमीने पराभव केला व विजेतेपद पटकावले.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीने नाणेफेक जिंकून
“प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु फ्रेंडस क्रिकेट अकॅडमीच्या उत्कृष्ट गोलंदाजी पुढे त्यांचा डाव अवघ्या ८३ धावांत गुंडाळला गेला. आठ षटकात केवळ १४ धावा देऊन ३ बळी घेणारा ओंकार थोरातने सामनावीर म्हणून पुरस्कार पटकावला. त्याने ३७ चेंडूत ३० धावा केल्या.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयोजकांच्या हस्ते करण्यात आले. मन आॉफ द सिरिज ओंकार थोरात बेस्ट बॉलर प्रसाद कुलकर्णी यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते.