शिरूर I झुंज न्यूज : शून्य ते पाच या वयातील बालकांना ‘दोन बूँद जिंदगीके’ असे म्हणत आज, रविवारी शिरूर तालुक्यातील उपकेंद्र निमगाव म्हाळुंगी येथे पोलिओ डोस देण्यात आले. गावचे पोलिस पाटील किरण काळे यांच्या हस्ते बालकांना लस पाजून उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
पोलिओ मुक्त महाराष्ट्र घडण्याच्या शासनाच्या धोरणानुसार सर्वत्र हि मोहीम सुरु असून उपक्रेंद्र निमगाव म्हाळुंगी येथे बालकांना डोस देण्याची मोहीम १०० % पूर्ण झाली.
हि मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी सीएचओ डॉ. भंडलकर, आरोग्य सेविका सुवर्णा वीर, आशा वर्कर सुजाता चव्हाण, अर्धवेळ परिचर जनाबाई चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.