विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पुणे I झुंज न्यूज : कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांच सन्मान आरपीआयच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई रामदास आठवले व सोनुताई खुडे (वर्मा) अध्यक्ष पुणे शहर, महिला आघाडी उत्तर भारतीय, यांच्या हस्ते डॉ. रश्मी वीर, डॉ. सुवर्णा गंगावणे, आशुतोष भोसले, डॉ. दिनेश हेडगिरे, तुषार रासगे, परिमल जोशी, हरीश गोरखे, अपेक्षा महिला बचत गट, लोहगाव आरोग्य कोठी सर्व सफाई कामगार आदी कोरोना योद्ध्यांचा सन्मान पुष्पगुच्छ व सन्मानचिन देवून सन्मान नुकताच करण्यात आला.
सीमाताई आठवले म्हणाल्या कि कोरोनाच्या काळात कोरोना योद्ध्यांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेले सामाजिक कार्य हे प्रशंसनीय आहे. कोरोनाची लस हि प्रत्येक नागरिकांनी टोचून घेतली पाहिजे. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
सोनुताई खुडे – वर्मा म्हणल्या कि कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कोरोंच्या काळात कोरोना योद्ध्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
या पुरस्काराचे आयोजन सोनुताई खुडे (वर्मा) अध्यक्ष पुणे शहर, महिला आघाडी उत्तर भारतीय, नितीन खुडे, स्वप्निल अण्णा कुचेकर यांनी केले होते. याप्रसंगी आरपीआयच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, महिला आघाडी शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा कमलाताई कांबळे, तसेच रिपाई पिं- चिं वाहतूक विभाग अजीज शेख, संदीप मोरेे, सुशील सवगोड, रिपाई ब्राह्मण आघाडीचे नेते मंदार जोशी, सिंकदर सुर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन शुभांगी शिंदे आणि आभार सोनुताई खुडे (वर्मा) यांनी मानले.