पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड दलित युवक आंदोलन चळवळीची पदनियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली. दलित युवक आंदोलन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांच्या उपस्थितीत सर्व पदनियुक्त्या करण्यात आल्या.
“शहर संघटक पदी गणेश वैरागर, कोषाध्यक्ष पदी सलीम खान, शहर सचिव पदी सुनील मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराचे पदाधिकारी यांच्या हस्ते सर्वाना नियुक्ती पात्र प्रदान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.”
यावेळी शहर अध्यक्ष श्रावण बगाडे, शहर उपाध्यक्ष संजय एडके, शहर कार्याध्यक्ष महेश भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष विनोद मोरे उपस्थित होते.