पिंपरी | झुंज न्यूज : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी एक वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या आंदोलनात मेहबूब शेख (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), रविकांत वर्पे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सूरज चव्हाण (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस), संजोग वाघेरे पाटील (शहराध्यक्ष – राष्ट्रवादी कॉग्रस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा), महेश हांडे (पुणे शहर युवक अध्यक्ष), सचिन घोटकुले, (पुणे जिल्हा युवक अध्यक्ष) आणि विशाल शंकर वाकडकर (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर) तसेच सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कोरोणामुळे शासनाने सांगितलेले नियम पाळून, मास्क वापरून आणि सामाजिक अंतर ठेऊन आंदोलनात सहभागी व्हावे असेही आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे.