पिंपरी | झुंज न्यूज : मातोश्री सामजिक संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितारक सेना जील्हा उपाध्यक्ष गणेश आहेर यांच्या शगूनचौक पिंपरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन संसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी मा. आमदार गौतम चाबूकस्वार, जिल्हाप्रमूख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमूख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमूख योगेश बाबर, महिला शहरसंघटिका ॲड उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिताताई तूतारे, पिंपरी विधानसभा समन्वयक रोमी संधू, चिंचवड विधानसभा संघटक हरिष नखाते, आधिक भोसले, बशीर सूतार, निखील येवले, मिना आहेर, वैशाली कूलथे, भाग्यश्री म्हस्के, नितीन घोलप, रमेश शिंदे, गोरख पाटील, प्रदिप दळवी, गणेश पाडूळे, बाळासाहेब गायकवाड, दत्ता गिरी, गणेश वाळूंज, बबलू कदम, अमित आहेर तसेच शहरातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी गणेश आहेर यांच्या कामाचे तोंडभरून कौतूक केले. तसेच मा. आमदार गौतम चाबूकस्वार यांनी गणेश आहेर यांचा सन्मान केला.