पिंपळे सौदागर | झुंज न्यूज : प्रभाग क्रमांक २८ मध्ये महिला प्रभाग अध्यक्षपदी कल्याणी भूषण शेलार यांची निवड करण्यात आली आहे.
शेलार यांच्या सामजिक कार्याची दखल घेत आमदार लक्ष्मण जगताप व प्रदेश महिला अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाख़ाली ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी शहर महिला अध्यक्ष उज्वलाताई गावड़े , नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे, नगरसेविका निर्मला कुटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुंदा भिसे, शहर महिला उपाध्यक्ष रंजना चिंचवडे, मंडल अध्यक्षा वैशाली जवळकर, सायली शेलार आणि पदाधिकारी उपस्थित होते.