पिंपरी | झुंज न्यूज : पहिल्या पत्निच्या निधनाची बतावणी करून एक – दोन नाही तर तब्बल चार महिलांची अब्रू लुटण्याची करामत करणाऱ्या सहाय्यक फौजदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामधे एक महिला पोलिसही बळी पडली आहे. पंडितराव उर्फ तात्याराव बाबूराव तापकीर (वय ६० रा.चरोली बुद्रुक)असे गुन्हा दाखल झालेल्या निवृत सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. दुसऱ्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ही घटना २०१३ ते २० डिसेंबर २०२० पर्यंत विनायक नगर नवी सांगवी , भोसरीतिल प्रतिक लाॅज, चाकन नित्यानंद लाॅज, फूरसूंगी येथे घडला आहे.
आरोपीने पहिली पत्नीचे निधन झाले असल्याचे सांगून फिर्यादी बरोबर विवाह केला त्यानंतर आनखी दोन महिलांबरोबर विवाह केला यामधे एक महिला पोलिसही फसली आहे. फिर्यादी पत्नी ने लैंगिक छळाचा आरोप केल्याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली हा त्रास असाहाय्य झाल्याने अखेर पोलिसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम हे करत आहेत.