आकुर्डी I झुंज न्यूज : आकुर्डी प्रभाग क्र. १४ मधील सर्व युवा कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून रात्रीच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप करीत मायेची उब देण्यात आली.
चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते, परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते. समाजातील अशाच काही वंचीत, भीक मागून खाणारे मनोरुग्ण, बेघर गरीब कामगार, दिव्यांग बांधव यांना जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने आकुर्डी सोशल फाउंडेशन च्या वतिने थंडीपासून बचाव व्हावी म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची उब दिली आहे.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक के.के कांबळे, अध्यक्ष वाहिद पटेल, सरचिटणीस वैजनाथ शिरसाट , आकुर्डीतील उद्योजक प्रमोद कुटे, आशिष चव्हाण, राजेश जोगळे, संदिप जयस्वाल, राकेश मोरे, मयुर पाटील, नितेश इंगळे, आर्यन गायकवाड, अजय जवळकर, प्रफुल काळे पाटील, योगेश गोकुळे, सचिन निकम, नवनाथ ढेरंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते