पुणे | झुंज न्यूज : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हाच्या वतीने भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्केट यार्ड येथे रॅली सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण परवानगी ऐनवेळी नाकारली गेली व त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा रॅली सुरू होण्यापूर्वी जमा झाला. पण तरीही रॅली नियोजित असल्यामुळे लोकं जमण्यास सुरू झाल्यामुळे गनिमी कावा वापरात कार्यकर्त्यांकडून सारसबाग, पुणे येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली व ती यशस्वीपणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पूर्ण करण्यात आली.
युवा पुणे जिल्हाध्यक्ष अजिंक्य दिलीप बारणे, गौरव जाधव, वैभव भोसले, प्रवीण मोरे, संतोष साठे, प्रेमराज पवार, गोकुळ पवार, आदित्य बारणे, अभिजित बारणे, सुयोग बहिरट, निरंजन करडके, साहिल कोईराला यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने रॅली यशस्वी झाली.