. पुनावळेतील सोसायटीधारकांचा महायुतीचे शंकर जगताप यांना एकदिलाने पाठींबा
. विकासकामांना ब्रेक लावणारे नको तर, गती देणारे सरकार हवे – शंकर जगताप
. पुनावळेतील सोसायट्यांमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा झंझावाती प्रचार
चिंचवड I झुंज न्यूज : ज्या पद्धतीचा विकास शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड या गावांचा झालेला आहे. तसा विकास अद्यापही पुनावळे गावचा झालेला नाही. मात्र आमची सर्वात मोठी कचरा डेपोची समस्या आमदार अश्विनी जगताप यांनी सोडविली. आणि त्यासाठी शंकर जगताप यांनीही ज्याप्रकारे नियोजनबद्ध पाठपुरावा केला. त्याच प्रयत्नांचे यश म्हणून आमच्या पुनावळेकरांच्या डोक्यावरून कचरा डेपोचे भूत उतरले. असाच यापुढेही आमच्या पुनावळे गावचा स्मार्ट विकास करण्यासाठी स्मार्ट व्हिजन असणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच या भागाचे आमदार असावेत आणि त्यासाठी आम्ही पुनावळेतील सर्व सोसायटी धारक एकदिलाने जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन पुनावळे गावातील सोसायटी धारकांनी दिले.
भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पुनावळे येथील सोसायट्यांमध्ये झंझावाती दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात जगताप यांनी पुनावळेमधील एंफीनिटी टॉवर सोसायटी, साईप्रस सोसायटी, पुणे विले सोसायटी, रुद्राक्ष सोसायटी, डी.एस.के सोसायटी, व्ही. जे. जावडेकर सोसायटी, साईब्लिस्ट सोसायटी, मालपाणी सोसायटी, गोल्डन ट्रेजर सोसायटी, द प्रोव्हीन्स सोसायटी, संटोसा प्राईड सोसायटी, सिरिको ग्रँड सोसायटी, 7 प्लमेरिया सोसायटी सर्व सोसायट्यांना भेट देऊन तेथील रहिवाशांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी सोयायटीधारकांनी जगताप यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सोसायटीधारकांनी त्यांना येणाऱ्या दैनंदिन समस्या जगताप यांना सांगितल्या. विशेषतः चांगले रस्ते, मुबलक पाणी, प्रदूषण मुक्त परिसर, सुसज्ज उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, नाट्यगृह या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार सोसायटीधारकांनी यावेळी केल्या.
ज्या पद्धतीने आमदार अश्विनी जगताप आणि तुमच्या पाठपुराव्यामुळे येथील सर्वात गहन कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागला, त्याबद्दल पुनावळे गावातील प्रत्येक नागरिक तुमचा आभारी आहे. आणि यापुढेही पुनावळे गावातील सर्व समस्या सोडवून गावाचा स्मार्ट विकास करण्यासाठी पुनावळे गावातील आम्ही सर्व सोसायटीधारक एकदिलाने आणि एकजुटीने तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास उपस्थित सर्व सोसायटीधारकांनी जगताप यांना दिला.
दरम्यान, जगताप यांनी बोलताना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी अनेक चांगले प्रकल्प राबविले आहेत. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामांना ब्रेक लागला होता. मात्र महायुतीचे सरकार सत्तेत येताच विकासकामांना गती मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत विकासकांना ब्रेक लावणाऱ्यांना घरी बसवून विकासकामांना गती देणारे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणायचे आहे.
तसेच येणाऱ्या काळात पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड या भागात ज्याप्रमाणे मोठे उद्यान, कलाप्रेमींसाठी नाट्यगृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी सुसज्ज खेळाचे मैदान, वाहतुकीसाठी सुसज्ज चांगले रस्ते, पदपथ, यांसारख्या सुविधा आहेत अगदी तशाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक स्मार्ट विकासकामे पुनावळे भागात होतील असे आश्वासन जगताप यांनी सोसायटीधारकांना दिले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक शैलेश मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, नवनाथ ढवळे, माजी उपसरपंच सुभाष रानवडे, नवनाथ जांभुळकर, सुनील ढवळे, महावीर सुर्यवंशी, सुरेश रानवडे, ज्ञानदेव काटे, जालिंदर दर्शीले, यशवंत गवारे महाराज, दत्तात्रय ढवळे पाटील, रामदास काटे, बाळासाहेब ढवळे, धनाजी कोयते, गणेश झेंडे, संजय वाघेरे, विजय दर्शीले, सुरेश दर्शीले, राहूल ढवळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रशांत संत व सदस्य, बाजीराव बहिरट, शुभम भुजबळ, दिलीप तापकीर, संतोष मांदळे, दादा ढवळे, किरण बोरगे यांच्यासह विविध सोसायटीमधील रहिवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.