अतिक्रमण कारवाई दरम्यान आर्थिक भ्रष्टाचाराच झाल्याचा आंदोलकांचा आरोप
पुणे I झुंज न्यूज : आंदोलनाच्या तेरा दिवसानंतर आता मोबोस येथील रहिवासी आणि व्यवसायिकांचा मोर्चा लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे निघाला. मोबोस येथील रहिवासी आणि व्यवसायिकांवर कारवाई करताना पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी या लोकांच्या बाबतीत पुनर्वसन कायदा राबविण्याचा कुठेही प्रयत्न केलेला दिसून येत नाही. तसेच ज्या जागेवर सन 2000 पूर्वीपासून लोक राहतात किंवा व्यवसाय करतात अशा लोकांना अतिक्रमण कारवाई करून त्यांचे नुकसान करून काढल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या पुनर्वसन कायद्याच्या भंग व अवमान होत आहे असे आक्रमक मत आंदोलकांनी व्यक्त केले.
सदर मिळकतीवरील अतिक्रमण काढण्यापूर्वी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले व या जमिनीचे बेकायदेशीर भ्रष्टाचार मार्गाने खाजगी व्यक्तीने खरेदी विक्रीचे दस्त केले. यांच्यामध्ये कार्यालयात व सदर प्लॉटवर अनेक वेळा बैठका व भेटीगाठी झाल्या. त्याच दरम्यान त्यांच्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचाराचा व्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र मोरे यांनी केला आहे.
यावेळी दीपक गायकवाड, श्रीनाथ कांबळे, मिलिंद आहिरे, माऊली भोसले, बालाजी कुऱ्हाडे, पूजाताई धनघव, जुलैखा खान, आशुतोष भोसले यांच्यासह मोबोस येथील व्यवसायिक व रहिवासी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भव्य दिव्य मोर्चामध्ये सहभागी झाले होते.