तोडकर वाडी येथील जिल्हा परिषदच्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
शिरूर I झुंज न्यूज : स्वातंत्र्य दिनानिमित्त शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोडकर वाडी येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी झालेल्या प्रभात फेरीच्या वेळी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. मराठी माध्यमातून शिकून सीए सारख्या अती महत्त्वाच्या पदावर राजमान झालेल्या अजय सुभाष ढमढेरे (सरदार) याचा आई-वडिलांसह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांची भाषणे पार पडली. मुलांचे जबरदस्त पाठांतर पाहून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक निलेश गायकवाड यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी गावचे माजी उपसरपंच गणेश तोडकर यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप तर ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शिरूर तालुका शिरूर तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे सरदार, विभाग प्रमुख नितीन मुळे पाटील, श्री तोडकर व मुख्याध्यापक निलेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली. दरोडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमासाठी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, विभाग प्रमुख नितीन मुळे, उपविभाग प्रमुख दीपक दादा इंगळे, विकास सोसायटीचे तज्ञ संचालक माऊली नरके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ भुजबळ, उपाध्यक्ष सोमनाथ मुळे, शिवसेना शाखाप्रमुख राहुल मुळे, युवासेना प्रमुख मयूर मुळे, मा. ग्रामपंचायत सदस्य उत्तम मामा रासकर, अण्णासाहेब तोडकर, माजी उपसरपंच चंद्रकला तोडकर, उद्योजक विशाल तोडकर, गणेश तोडकर, इंजिनीयर रंगनाथजी भुजबळ, ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रय तोडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसैनिकांनी मराठी शाळा वाचवण्याचा व आपली मायबोली असणाऱ्या परिसरातील सर्व मराठी शाळा यापुढेही जिवंत ठेवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला.