मुंबई I झुंज न्यूज : लवकरच दहीहंडी उत्सव येत आहे. हा उत्सव महाराष्ट्रात मोठया धूमधडाक्यात सर्वत्र साजरा केला जातो. या उत्सवाची रंगत अशी की उंच उंच एकावर एक असे थर रचत दहीहंडी बाळ गोपाळाच्या हातानी मोठया जल्लोषात फोडली जाते. आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात या उत्सवाचे महत्त्व आणि हा उत्सव कसा साजरा केला जातो हे दाखवण्यात आले आहे. पण पहिल्यांदाच हा उत्सव एखाद्याच्या जीवावर, एखाद्याच्या कुटुंबावर कितपत चांगले किंवा वाईट परिणाम करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न स्वामी स्पर्श फिल्मच्या निर्मितीतून निर्माते विलास चव्हाण आणि दिग्दर्शक अमित मोहिते यांनी “थर” या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे.
कोकणरत्न पुरस्कर, दादासाहेब फाळके पुरस्कार, गुरुगौरव शिक्षक सन्मान, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले आणि विविध शॉर्ट फिल्म फेस्टिवल चे लेखन, दिग्दर्शन करून त्यातही पुरस्कार मिळवलेले, व्यवसायाने शिक्षक असलेले आणि पहिल्या “थर” या चित्रपटाची निर्मिती करणारे, अभिनेते निर्माते विलास चव्हाण हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत . तर या चित्रपटाची सह निर्माती वैदेही विलास चव्हाण आहेत.
त्यांच्या सोबत अभिनेत्री पुनम विनेकर, अभिनेता, निर्मिती प्रमुख रंगराव घागरे, बालकलाकार कबीर पवार, यांचा या चित्रपटात समावेश असुन, त्यांच्या सोबत अनेक रंगमंच कलाकारांना चित्रपटात प्राधान्य देण्यात आलं आहे. चित्रपटाचे बरेचसे शुटींग हे नवी मुंबई परिसरात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कै. उमेश पवार आणि अमित मोहिते आहेत.
सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना आमची विनंती आहे की, १६ ऑगस्ट ला “थर” हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा. असे आव्हान चित्रपटाचे निर्माते विलास चव्हाण आणि दिग्दर्शक अमित मोहिते यांनी केले आहे.