पुणे । झुंज न्यूज : पाषाण येथील गुलमोहर प्लाझा सोसायटीमध्ये सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.
पार्किंग तुडूंब भरुन दोन दिवस झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी इमारतीमध्ये पाण्याची तळी साचली तर पार्किंग मधील गाड्या पाण्यामध्ये बुडून पाणी घरात शिरले असून घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे संतोष खुडे यांनि सांगितल आहे.
याप्रसंगी एम एस सी बी च्या कर्मचाऱ्यांना त्वरित बोलावून कालपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सोसायटीचे चेअरमन रोहिदास भारमळ यांनी वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागास संपर्कात राहुन अखेर दोन दिवसांनी महानगरपालिकेचे पथक येऊन चेंबर साफ करत पार्किंग मधील साचलेले पाणी काढण्यात आले व चेंबरचे सर्व झाकण खोलून घरातील पाण्याचा निचरा करणयात आला आहे. त्यानंतर सोसायटी धारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे सोसायटीतील नागरिक हैराण झाले असून महापालिकेने या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे मागणी सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.