पौड I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील क्रीडा क्षेत्रात विविध खेळांमध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविलेला पैलवान प्रसन्न पप्पू कंधारे याची जागतिक सिलंबम (मर्दानी खेळ लाठीकाठी) साठी भारतीय संघात निवड झाली आहे.
दिनांक ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान जिमी जाॅर्ज इंडोर स्टेडियम तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत मुळशीच्या काठीचा आवाज घुमणार आहे. कुमार प्रसन्न कंधारे हा शालेय शिक्षण पंडितराव आगाशे शाळेत नववी मध्ये शिक्षण घेत असून सिलंबमची काठी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुंडलिक कचाले यांच्याकडे तो सिलंबमचा सराव करत आहे.
श्री बालाजी प्रतिष्ठान कबड्डी संघाचे प्रशिक्षक भरत शिळीमकर हे प्रसन्न कडून कसरत मेहनत करून घेत आहे. कोंढावळे गावातील विशेष दंडाधिकारी अनंतराव चौधरी यांचा नातू आहे. तर पत्रकार पप्पू कंधारे व मा. ग्रामपंचायत सदस्य कविता पप्पू कंधारे यांचा पुत्र आहे.