पुणे I झुंज न्यूज : राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन आयोजित राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले आज महाराष्ट्रातील काही भागात सुरू असलेले राजकारण अस्वस्थ करणारे आहे. या परिस्थितीत राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कार्य अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील खेळाडू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू सामाजिक पुरस्कार दिला जातो. यातून त्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्याचे काम फाउंडेशन करते.” असे विकास पासलकर यांनी प्रास्तविकात सांगितले. फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. *रायगडावर ताक दही विकून शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मा.दीपकभाऊ मानकर यांनी स्वीकारली असल्याचे जाहीर करून पहिल्या मदतीचा चेक सुधा देण्यात आला.
सोशल मीडियावर फाउंडेशनच्या ज्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्या त्याला प्रतिसाद म्हणून पुण्यात शिक्षणासाठी आलेले परदेशी विद्यार्थी प्यड्रो (पोर्तुगाल), कारा प्रीस (UK), ज्याडन बॉण्ड (UK), आणि त्यांची भारतीय सहकारी हर्शिता हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्याचा सुधा सन्मान इंग्रजी शाहू चरित्र देऊन करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे संपन्न झाला. राजर्षी शाहू महाराज सामजिक पुरस्कार कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज चरित्र ग्रंथाच्या लेखिका डॉ. देविकाराणी पाटील, पुणे महावितरण चे मुख्य अभियंता श्री.राजेंद्र पवार , प्रोफाईव्ह इंजिनीयरिंग प्रा.ली.चे उद्योजक मा.माणिक डावरे, उद्योजक, विद्यार्थी व कामगार नेते श्री.बळीराम डोळे, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री.सचिन बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार श्री.राजू शिवाजी गोडसे – इनामदार यांना प्रदान करण्यात आले. या महोत्सवासाठी आमदार रवींद्र धंगेकर, मराठा सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.राजेंद्र दुबल, नंदकुमार ढाणे, आखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. विकास पासलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष श्री.दीपकभाऊ मानकर, मा. नगरसेवक बाळासाहेब बोडके,ज्येष्ठ विधीज्ञ श्री.मिलिंद पवार, अंध अपंग क्रिकेट असोसिएशनचे कोच श्री. यशवंत भुजबळ मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव मारुतीराव सातपुते, डॉ संतोष वाघ फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.स्वप्नील चौधरी आणि विराज तावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत धुमाळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल ढगे सचिन जोशी निलेश इंगवले मंदार बहिरट, युवराज ढवळे, अभिषेक वडघुले, राजेश कदम यांनी परिश्रम घेतले.