पिंपरी I झुंज न्यूज : ऑल सेट्स हाय स्कूल तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी योगा दिन साजरा केला जातो. यावेळी 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांकडून क्रीडा शिक्षक अभिजीत परदेशी यांनी अतिशय सुंदर रित्या योगा चे प्रात्यक्षिक करून घेतली व हे करत असताना पालकवर्गांकडून कौतुकाची थाप मिळवली.
याप्रसंगी पूर्ण स्कूल योगामय वातावरणात तल्लीन झाली होती. आजच्या धकाधकीच्या काळात जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकता शिवाय मनावर हे चांगले संस्कार आपण करू शकता हा उद्देश याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी दिला.
तसेच स्कूलमध्येच योगाचे महत्व न राहता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत योगाचे महत्त्व फलकाद्वारे सुंदर सुंदर योगाचे संदेश देणारे बोर्ड हातात घेऊन नागरिकांना योगाचे महत्व पटवून दिले. यावेळी येणारे जाणारे लोकांनी देखील त्या मुलांना कौतुकाची थाप दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व साळुंखे आयुष कांबळे यांनी केले. कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व सुंदररित्या केल्याबद्दल शाळेच्या प्राचार्य डॉ जस्सी जयसिग, मुख्याध्यापिका डॉ अरुणा वाल्हेकर, संचालक जयसिंग डी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी पत्रकाद्वारे दिली.