प्रबोधनकार गायक अनिरुद्ध बनकर यांचा गीतांचा जलसा
थेरगाव I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे गत वर्षी प्रमाणे यंदाही अखिल थेरगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे भारतीय थोर विचारवंत समाज सुधारक शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या मोहत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंगळवार दिनांक २१ , बुधवार दिनांक २२ आणि गुरुवार २३ मे या तिन्ही दिवशी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा गीत संगीतमय कार्यक्रम संपन्न झाले. २१ तारखेला शांततामय धम्म रॅली थेरगाव परिसरात काढली. २२ तारखेला मान्यवरांची भाषणे आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधनकार डॉ. अनिरुद्ध बनकर यांचा सांगीतिक बुद्ध भीम गीतांचा जलासा सादर झाला. तर २३ तारखेला गीत-गायन, नृत्य आणि वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषके देण्यात आली. डिफेन्स फोर्स लीग चे अध्यक्ष पॅराकमांडो रघुनाथ सावंत साहेब, निलेश विसपुते आणि टीम उपस्थित होते.
थेरगाव जगताप नगर, डी मार्ट च्या शेजारील मैदानावर झालेल्या या वैचारिक आणि रंगतदार कार्यक्रमांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये स्विकृत नगरसेवक संदीप गाडे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, गोपाळ मळेकर, नगरसेवक चंद्रकांत नखाते, चित्रपट निर्माते बाळासाहेब अडसूळ, माजी नगरसेविका विमलताई जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालका ग प्रभाग अध्यक्ष नगरसेवक अभिषेक बारणे आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून बुद्ध पौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिल्या.
डिफेन्स फोर्स लीग चे रघुनाथ सावंत साहेबांनी संविधान जागृत विषयी व्याख्यान दिले. तर सचिन साठे यांनी समाज एकत्र आला पाहिजे आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार दिला तोच विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या गीत लेखनातून आपल्याला सांगितला तो म्हणजे जग बदल घालुनी घाव, सांगुनी गले मला भीमराव. यानुसार समाजाने एकत्र आलं पाहिजे बाबासाहेबांच्या विचारावर चाललं पाहिजे तसेच संविधान रक्षण करण्यासाठी देखील बेकीची नव्हे तर एकीची गरज असल्याचे मत सचिन साठे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहिद वीर जवानांना अमर ज्योति तयार करून पुष्पचक्र अर्पण करून वीरांना मानवंदना देण्यात आली.
या तीन दिवसीय मोहत्सवामध्ये थेरगाव परिसरातील सामान्य नागरिक आणि समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या दैदिप्यमान कार्यक्रम आयोजनामध्ये अखिल थेरगाव बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कष्ट घेतले. यामध्ये नरेंद्र माने, अमोल साऊदेकर, विकास गडे, संतोष कांबळे, किरण जगताप, गणेश जगताप, सागर ओव्हाळ, अजय अव्हाळ, दीपक सोनकांबळे, सागर गायकवाड, श्रीहरी सोनकांबळे, राकेश कांबळे, दत्ता गायकवाड, परमेश्वर जगताप, आकाश ओव्हाळ, विशाल सुरवासे, कैलास राऊत, युवराज गायकवाड आणि समस्त जगताप नगर मधील जगताप कुटुंबीय यांचे मोलाचे योगदान लाभले. नृत्य आणि वक्तृत्व सपर्धांचे परीक्षण प्रा. राहुल समिंदर, डी. संतोष रोडे, प्रा. दिलीप वाघमारे यांनी केले. एस के ग्रुप काळेवाडी यांचे देखील सहकार्य लाभले. तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय सोनवणे यांनी कले.