सृष्टी जोशीचे सोयाबीन संशोधन आॅस्ट्रेलीयात सादर होणार हा अभिमानाचा क्षण – प्राचार्य डाॅ संजय खरात
पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान (Biotech) विभागातील सृष्टी जोशी या विद्यार्थीनीने संशोधनात लक्षणीय कामगिरी केली आहे. हे संशोधन आँस्ट्रेलीयातील केर्न्स येथिल आंतरराष्ट्रीय काॅन्फरन्समधे सादर करण्याची संधी ‘काॅन्फरन्स आॅन प्लांट माॅलिक्युलर बायालाँजी’ यात मिळणार आहे.
यासाठी तीला भारतातील व ईंग्लड येथील दोन नामवंत संस्थाकडून संशोधन अनुदान जाहिर झाले आहे. ती गेली २ वर्ष ‘ प्रतिकूल जमिनीतील क्षारयुक्त परिस्थीतीत सोयाबीन पिकाची वाढ व उत्पादन ‘ या विषयावर ती संशोधन करत आहे.
भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे(एस ई आर बी) या संस्थेने तीला १.३ लाखाचे अनुदान जाहीर केले आहे. यात प्रवास खर्च, नोंदणी शुल्क, निवास खर्च, परिषदेमधे उपस्थितीची सुविधेबरोबरच व्हिजाचा पण खर्चाचा समावेश आहे. या संस्थेकडुन नेहमीच युवा संशोधकांना सहाय्य केले जाते.
या शिवाय एस ई बी कंपनी आँफ बायालाॅजिस्ट, ईंग्लड हे रु ५०,००० (५०० युरो) अनुदान देणार आहे. यामध्ये २४ जुन ते २८ जुन यामधील आॅस्ट्रेलीयातील खाणे व रहाणे याचा खर्च समाविष्ट आहे. हा विषय महाविद्यालयातील बायोटेक मधील मार्गदर्शक डाॅ विनयकुमार यांच्या संशोधना अंतर्गत ‘ भाभा आटोमिक रिसर्च सेंटर’ तर्फे सरांना मिळणार्या अनु्दाना मधून सृष्टी जोशी हीने हा विषय घेतला आणि या विषयात पी एच डी करत आहे.
हे संशोधन सोयाबिनचे पिक खराब जमिनीत किंवा आहे त्या जमिनीत जास्त घेता यावे, त्याचे उत्पादन वाढावे म्हणून केले आहे. यामुळे दोन फायदे होतील सोयाबीन हे हाय प्रोटीन असल्याने भारतीय लोकांची प्रोटिन्स गरज पूर्ण करेल व भारतातून हे उत्पादन जास्तीत जास्त निर्यात करता येईल. यातुन शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळेल असे मला वाटते असे सृष्टी जोशी हिने सांगितले. ती म्हणाली मी एम स्सी याच महाविद्यालयातुन पूर्ण केले आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी मला महाविद्यालयातुन पूर्ण मदत मिळाली आहे.
प्राचार्य डाॅ संजय खरात याबद्दल बोलताना म्हणाले, महाविद्यालयातील बायोटेक संशोधन केंद्र हे एक उत्कृष्ठ दर्जाचे सेंटर आहे. या मधे आपण संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. आपल्या महाविद्यालयाला भारत सरकारचे डिपार्टमेंट आॅफ बयोटेक्नाॅलाॅजी (DBT), डी एस टी, पी एम उषा या अंतर्गत संशोधन अनुदान मिळते. त्यामुळे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन होऊ शकते. असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन महाविद्यालयात होत आहे याचा मला अभिमान आहे. आमच्या महाविद्यालयात अशा संशोधनाला नेहमीच प्रोत्साहन मिळेल व त्यांना सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील.
डाॅ विनय कुमार म्हणाले’ आपण तांदुळ,सोयाबीन सारख्या पिकांवर संशोधन करतो. बदलत्या वातावरणाचे परिणाम आधुनिक तंत्रज्ञान वापरून कसे कमी करता येतील व यातुन जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे संशोधन आम्ही करतो.’
या साठी प्राचार्य डाॅ संजय खरात व उपप्राचार्य प्रा स्वाती कंधारकर यांचे मार्गदर्शन असते. प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह, पी ई सोसायटी, डाॅ प्रकाश दिक्षित उपकार्यवाह पी ई सोसायटी यांचे प्रोत्साहन असते.