मतदार मदत कक्षाचे पथक प्रमुख म्हणून सोनाली पोतले-देवकर यांची नियुक्ती : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते
पुणे I झुंज न्यूज : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव शोधण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदार मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.
मतदार मदत कक्षाचे पथक प्रमुख श्रीमती सोनाली पोतले – देवकर (भ्रमणध्वनी क्र. ८९७८०७००१०) या असून संगणक ऑपरेटर्स तसेच सहाय्यक म्हणून किरण गायकवाड ( भ्र.ध्व. क्र. ९९२३६८२३३० ), सुभाष शिवले ( भ्र.ध्व. क्र. ९६७३००२०२२ ), अंकिता कहाणे ( भ्र.ध्व. क्र. ८६२४८०६३३० ), विजय लोहार ( भ्र.ध्व. क्र. ९४२३२५३०४३ ) व उमेश तुपे ( भ्र.ध्व. क्र. ९८२२५००६७३ ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९९६९३० असा आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.