पुणे | झुंज न्यूज : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसा प्रचाराला प्रंचड वेग येत आहे. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोपरा सभा घेण्यास सुरूवात केलीय. आढळरावांच्या कोपरा सभांना आता नागरिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहेत. त्यातच अण्णापुर येथे गावकऱ्यांनी आढळरावांचं जंगी स्वागत केलं.
अण्णापुर येथे झालेल्या कोपरा सभेत आढळरावांनी लोकांना विश्वासात घेत लोकांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केलं. यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. मला तुम्ही पाठिंबा देणारच आहात. तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चित राहा, असे आवाहन आढळरावांकडून करण्यात आले.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रामलिंग येथे भेट देऊन ग्रामदैवत रामलिंग महादेवाचे आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले. शोभाताई रसिकलाल धारीवाल सभामंडपात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना गावाचे प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावणार असे आश्वासन दिले.
दरम्यान, कर्डेलवाडील येथेदेखील आढळराव यांचे उत्स्फुर्त स्वागत झाले. यावेळी प्रवीण कर्डिले म्हणाले की , सत्तेत नसतानाही आढळराव दादांनी आपल्या विकासकामांना हातभार लावला. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहु. या वेळी बोलतांना आढळराव यांनी पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढून हा प्रश्न मिटवला जाईल असेही त्यांनी सांगितले.