रावेत I झुंज न्यूज : कष्ट आणि सातत्य असल्याशिवाय समाजमान्यता मिळत नाही. साहित्यिक आणि ज्येष्ठ नागरिक समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे अशा गुरुजनांचा सन्मान समाजात व्हायला हवा. असे प्रतिपादन माजी नगरसेवक मा. मोरेश्वर भोंडवे आपल्या छोटेखानी भाषणात केले.
या प्रसंगी “अस्सल विडंबनासाठी मूळ साहित्यकृतीचे आकलन आवश्यक असते. त्यामुळे बौद्धिक रंजनाचा आनंद द्विगुणित होतो.” असे विचार अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत येथे व्यक्त केले.
होलिकोत्सव आणि धूलिवंदनाचे औचित्य साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ – प्राधिकरण आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ – रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगात रंगुनी साऱ्या’ या विनोदी आणि विडंबनात्मक काव्यमैफली मध्ये प्रा. तुकाराम पाटील बोलत होते.
सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर भोंडवे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, सचिव माधुरी ओक, तीर्थस्वरूप नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव शिरीष कुंभार आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ – रावेत यांच्या पिंपरी चिंचवड शहरातील चाळीस साहित्यिकांच्या लेखनाचा समावेश असलेल्या ‘जीवनसंध्या – २०२४’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. नवयुगचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या ३२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
‘रंगात रंगुनी साऱ्या…’ या काव्यमैफलीत बाबू डिसोजा, सुनंदा शिंगनाथ, आनंद मुळूक, राजश्री मराठे, सुप्रिया लिमये, राजेंद्र पगारे, सुहास घुमरे, दिलीप क्षीरसागर, अण्णा जोगदंड, योगिता कोठेकर, शोभा जोशी, रघुनाथ पाटील, माधुरी डिसोझा, अरुण कांबळे, प्रल्हाद दुधाळ, अतुल क्षीरसागर, प्रतिमा काळे, आदींनी विनोदी आणि विडंबनात्मक कवितांचे सादरीकरण करीत हास्यरसाचा परिपोष केला.
‘जीवनसंध्या – २०२४’ मधील लेखनाप्रीत्यर्थ रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, सीमा गांधी, प्रज्ञा घोडके, प्रदीप पाटील, रमेश वाकनीस, सुभाष चव्हाण, वंदना इन्नानी, नेहा कुलकर्णी, नंदकुमार मुरडे, गांधलीकर, पल्लवी चांदोरकर , बाबू डिसोजा या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कृत्रिम रंगांचा वापर टाळून उपस्थितांवर रंगबिरंगी फुलांची उधळण करून पर्यावरण पुरक धूलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यात आला.अश्विनी कुलकर्णी, शरद काणेकर, अनिकेत गुहे, अरविंद वाडकर, चंद्रकांत कुलकर्णी, रमेश माने, नंदकिशोर बडगुजर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. संपत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पी.बी शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.