पिंपरी I झुंज न्यूज : संपूर्ण देशभर पसरलेल्या टाटा सन्सच्या 98 कंपन्यांमधून उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून टाटा मोटर्सचे कर्मचारी नितीन श. यादव यांची निवड करण्यात आली.
टाटा सन्स तर्फे मुंबई हॉटेल ताज मध्ये इंडिव्हिजवल एक्सम्प्लेरी व्होलेंरींग अवॉर्ड प्रदान केल्याबद्दल टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियन तर्फे रविवार दि 24 मार्च 2024 रोजी अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नितीन यादव जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष शिशुपाल तोमर, सेक्रेटरी अजित पायगुडे, कार्याध्यक्ष सतीश काकडे, खजिनदार गणेश औदुंबर, उपाध्यक्ष चेतन बालवडकर तसेच माजी सेक्रेटरी संतोष दळवी व सर्व आजी माजी पदाधिकारी व असंख्य कामगार सभासद उपस्तीत होते.