पुणे I झुंज न्यूज : संत गाडगेबाबा ट्रस्ट तर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त परीट समाजातील सुशिक्षित व व्यापारी यांच्यासाठी स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हॉटेल किल्लेदार मांजरी फार्म हडपसर पुणे येथे अतिशय उत्साहामध्ये कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर Adv. विजय हरगुडे अध्यक्ष भाजपा कामगार आघाडी श्री प्रमोद वाकोडकर अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा यावेळी उपस्थित स्नेह मेळाव्याचे आयोजन Adv. आकाश काळे यांनी केले.
यावेळी माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर मत व्यक्त करताना म्हणाले की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्नेह मेळाव्याचे जे आयोजन केले आहे ते अतिशय उत्तम आहे परीट समाजाने आपले स्वतःचे अस्तित्व ओळखले पाहिजे व व व्यवसायामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून व्यवसायामध्ये प्रगती करावी.परीट समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन योगेश टिळेकर यांनी दिले.
श्री प्रमोद वाकडकर अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा याप्रसंगी बोलताना म्हणाले की परीट समाजातील सर्व बांधवांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा काही अडीअडचणी आल्यास आम्ही उद्योग आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपल्यासाठी प्रयत्नशील राहो. लॉन्ड्री व्यवसाय हा परीट समाजाचा पारंपरिक व्यवसाय असो त्याला परीट बांधवांनी आधुनिक मशनरी चा वापर करून व्यवसायात उन्नती करावी.
यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर श्री Adv. विजय हरगुडे प्रदेशअध्यक्ष भाजपा कामगार आघाडी श्री प्रमोद वाकोडकर प्रदेश अध्यक्ष उद्योग श्री.भुषण तुपे (उपाध्यक्ष भाजप पुणे शहर. धोबी महासंघ, श्री.शिवराज आप्पा घुले मा . सरपंच मांजरी बुद्रुक,जयश्रीताई आदमाने ( वरीष्ठ संघटक परीट सेवा मंडळ), श्री.राजाभाऊ कदम नगरसेवक. श्री.भुषण तुपे (उपाध्यक्ष भाजप पुणे शहर), Adv. सुहास कानगुडे (सचिव कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य)महाराष्ट्र शासन पुरस्कृत डॉ.रोकडे सर , ग्रामपंचायत सदस्य, श्री. हनुमंत गायकवाड (एअर फोर्स अधिकारी) श्रीरंग मोरे पत्रकार संतोष गोतावळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . Adv. आकाश काळे यांनी आभार व्यक्त केले.
संत गाडगेबाबा समाज मार्गदर्शन ट्रस्ट तर्फे सरकारी नोकरी विषयक जाहिराती व शैक्षणिकदृष्ट्या सर्व प्रकारचे मार्गदर्शन, शिष्यवृत्ती योजना व इतर सर्व क्षेत्रांतील रोजगार विषयक मार्गदर्शन व संधी, सरकारी योजना व मार्गदर्शन केले. आणि हाच आपल्या ट्रस्ट चा एकमेव उद्देश आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण करणे, व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, त्या मुळे आपल्या नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन, प्रेरणा व दिशा मिळावी. हा उद्देश यशस्वी झाला.
या कार्यक्रमाचे आयोजक कमिटी संत गाडगेबाबा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट आकाश ज्ञानोबा काळे. व वैभव मोरे व किरण पवार, प्रसाद साळुंखे, महादेव कोकाटे, मार्गदर्शक पुणे महानगरपालिका माजी उपमहापौर सुरेश नाना नाशिककर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती काळे व आभार एडवोकेट आकाश काळे यांनी मानले.