राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजन
पिंपरी I झुंज न्यूज : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळभोर नगर येथे महिला भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
धकाधकीच्या जीवनात घर, कुटुंब, नोकरी व्यवसाय सर्व सांभाळताना महिला भगिनींचे स्वतःच्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच महिला भगिनींनी स्वतः निरोगी राहण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शोभा विश्वनाथ साठे, कल्पना तानाजी घाडगे, कमल दिनकर धाइंजे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले होते.
आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून एकाच ठिकाणी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये 250 हुन अधिक महिला भगिनींनी सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.