महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : परीक्षा कालावधीत दहावी, बारावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पीएमपीएल बससेवा मोफत करा व बस मधे विशेष जागा आरक्षित ठेवा याबाबत आज डॅा संजय कोलते मुख्य व्यवस्थापक पीएमपीएमएल पुणे यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिंचवड शहरातर्फे निवेदन देण्यात आले.
नुकत्याच १२ वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे व लवकरच १० वीच्या बोर्डाच्या परीक्षाही तोंडावर आहेत,या धर्तीवर १०-१२वी च्या विद्यार्थी मित्रांना बस मधुन पेपर ला जाताना बराच वेळ प्रवास करावा लागतो त्या ठिकाणी पीएमपीएल बस मधे काही आरक्षित जागा मिळाल्यास त्या वेळेत त्यांची थोडी अभ्यासाची उजळणी होईल यासाठी पीएमपीएल बस मधे परीक्षाकाळात काही जागा आरक्षित ठेवाव्यात.
तसेच ग्रामिण भागातुन अनेक विद्यार्थी या परीक्षा केंद्रांसाठी शहरात येत असतात, काहींची परिस्थिती अतिशय बिकट आहे, ते अक्षरशाह चालत पेपर ला येत असतात, या सर्व मुलांना परीक्षाकाळात बससेवा मोफत पुरवावी जेनेकरुन त्यांची जायची यायची व्यवस्था सुखरुप होईल व त्यांना परीक्षांकडे लक्ष देण्यासाठी व अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल.
अशा दोन मागण्या करण्यात आल्या, यावरती सकारात्मक प्रतिसाद देत डॅा संजय कोलते यांनी आपल्या सहकारी ट्रफिक मॅनेजर तसेच कंडक्टर ना याबाबत सुचना दिल्या आहेत की १०-१२ वीच्या विद्यार्थाना बस मधे बसण्यास सहकार्य करावे तसेच पुढिल दरवाजाने विद्यार्थ्याना चढण्यास मुभा द्यावी.
यावेळी हेमंत महादेव डांगे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अनिकेत परशुराम प्रभु.
शहरअध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिंचवड शहर तसेच ओंकार सर्जेराव पाटोळे उपशहरअध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, तुषार वराडे निखिल गावडे हे यावेळी उपस्थित होते.