वाकड I झुंज न्यूज : आनंद जेष्ठ नागरिक संघातमकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू तिळगुळ वाण व भेटवस्तू देऊन साजरी करण्यात आली.यावर्षी त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष वृषालीताई मरळ होत्या .तर प्रमुख पाहुण्या स्वाती कलाटे होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात समूह दीप नृत्य, अनेकविध गीतगायन,कथाकथन, कोडे, विनोद सादरीकरण, आत्मकथन, सायानी पत्र वाचन असे रंगारंग कार्यक्रम तर होतेच त्याशिवाय आजी आजोबांच्या नातवांच्या कला गुण यांना वाव देत त्यांचे देखील वाव देण्याचे ठरवल्याने कुमार सिद्धार्थ याने पियानोवर आपली कला सादर केली.
सदर कार्यक्रमात बोरकर, निकुंभ, विजया चौधरी, बऱ्हाटे, बोंडे, कानडे, जाजू, भेरकर, बेलोकर, पाठक, सफाई, चित्रा, रुबी, केसकर यांनी कार्यक्रमात सहभागी नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे, नलिनी कोल्हे, सुरेश बोरकर, मुरलीधर लहाने, अप्पासाहेब तेली, माधव बऱ्हाटे, अशोक बोंडे, प्रवीण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.