भोसरी I झुंज न्यूज : भोसरी येथील श्री टागोर शिक्षण संस्थेच्या विद्यालयात नुकतीच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जागृती ठाकरे व अधक्ष्या आरती वारोकर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत आगे व संतोष काळे, दिलीप पाटील ,शशिकांत ताटे , रवी खंदारे ,यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ यांच्या जीवन विषयक पैलू या विषयी माहिती सांगितली तर अध्यक्षा यांनी स्वामी विवेकानंद यांचा जीवन पट विद्यार्थ्या समोर मांडण्यात आला.
यावेळी प्रस्तुत कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 9 वी च्या तृप्ती खेडकर, निवेदिता हूर्मुंजे , त्रिशा माने , प्रतिमा वानखेडे , स्वरा आवळे , विद्या राठोड , श्रुती यामुलवाड , श्रावणी सोळूखे , श्रेया वाकुळे, स्वरा पवार, कनक उघडे , श्राव्य आवळे, ओवी तरडे, आदित्य मुंगदे वर्षा चव्हाण, अदिती भालेकर ,श्रावणी तीर्थे , या विद्यार्थिनी वेशभूषा केली होती. तर एकनाथ जाधव यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जोरदार आदर्शवत माहिती भाषणातून सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सागर हिरवे यांनी केले तर आभार बालवाडी विभाग प्रमुख दिपाली दाभाडे यांनी केले. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन व श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे पाटील व संस्थेचे सचिव सुरेश फलके उपाध्यक्ष महेश घावटे व युवा नेते युवराज बापू लांडे,सुरज लांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सुलाखे, मयूर कांबळे , बुळे विठ्ठल पल्लवी कौटे, मनीषा सोनवणे, बांडे माधुरी स्विटी धाइंजे, आरती वरोकर , सोनाली थोरात,रुपाली रांगोळे ,साधना हंबिर यांनी सहकार्य केले, प्रस्तुत कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख माया पाटोळे व सूर्यकांत राठोड मंजु सांगळे ,प्रियंका लांडे , आबा मस्तूद ,गणेश फुगे यांनी परिश्रम घेतले .