पुणे I झुंज न्यूज : मोरगिरी धनगर वाडीतील अहिल्यादेवी आध्यात्मिक युवक्रांती संघाने 9 जानेवारी पासून संत वैष्णव मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळावाची सांगता ब्रह्ममूर्ती सतोषदादा महाबले याच्या कीर्तनातून नुकतीच झाली आहे.
वैष्णवजन, भाविकभक्त, प्रज्ञावंत, संतसज्जनांना परमानंद होतो. आपल्या सर्वांचे आराध्य ह्यदयस्त महाबले महाराज दु:ख,क्लेश,धय,चिंता,अशांतता यांचे समुळ हरण करणारे,चराचरांचे पालणकर्ते श्री संत महाराज असून अव्यक्त, अदृश्य, निर्गुण, निराकार अशा परमतत्वाला व्यक्त, दृश्य, सगुण, साकार रुपात साकारणारे चुंबक आहेत. भगवंत जो एकच आहे, त्याच्यामध्ये आपल्या मी पणाचा अंत होणे याचे नाव एकांत. एकांत हे आनंदाचे स्थान आहे, भगवंताचा शाश्वत आनंद अनुभवण्यासाठी एकांताची जरुरी असते, एकांत ही मनाची अवस्था आहे आणि ही अवस्था वाढविण्यासाठी, चिरंतर टिकवण्यासाठी, तीची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी एकच उपाय म्हणजे नाम अथवा नामस्मरण होय. अश्या नामरुपी वृक्षाच्या शाखा नित्यनित्य (अविरत) पल्लवीत रहण्यासाठी, श्री संत महाबले महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने व अनेक स्नेही भाविकांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
ह भ प प्रेममूर्ती सुरेश महाराज झोरे याच्या मार्गदर्शनाखाली वैष्णव मेळावाप्रसंगी सकाळी सद्गुरू मूर्ती अभिषेक विणापूजन व प्रतिमपूजन, चिंतन, शिबिर साधकाचे मनोगत, सार्वजनिक भजन व ह भ प पांडुरंग ढवळे महाराज यांचे उदघाटनपर कीर्तन झाले.
चिपळूणच्या श्रुतिताई सुतार याचे हरी कीर्तन युवा कीर्तनकार ह भ प दीपक दादा शिंदे महाराज व एकनाथदादा झोरे महाराज यांचे झाले. गुरुवर्य ब्रम्ह मूर्ती संतू बाबा महाबाले . ह भ प.प्रेम मूर्ती सुरेश महाराज झोरे, श्री.प्रकाश जी साहेब भंडारे, ह भ. प निवृत्ती महाराज झोरे, ह भ. प.पांडुरंग महाराज ढवळे ह भ प संतोष महाराज आखाडे, ह भ प.नारायण महाराज शिंदे ह भ प नारायण महाराज झोरे, तसेच समाज रत्न पुरस्कार अशोक जंगले सर यांच्यासह गायनगधर्व तुकाराम महाराज शिंदे यांना विशेष पुरस्कार देउन गौरविण्यात आले आहे.
तालुक्यातील असंख्य राजकिय व वारकरी संप्रदायाचे मान्यवर उपस्थित होते. धनगर वाडी येथे पार पडला ब्रह्ममूर्ती सतोषदादा महाबले महाराज यांच्या कालाच्या कीर्तनाने वैष्णव मेळाव्याची सांगता झाली.