श्रीगोंदा I झुंज न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गडदुर्ग संवर्धन सेलचे राज्यप्रमुख योगेश शेलार यांनी नुकतीच ऐतिहासिक किल्ले पेडगाव धर्मवीरगडास (बहादुरगड) भेट दिली. भेटी दरम्यान राजेशिर्के वंशज घराण्याच्या “रंजनाई” निवास स्थानी सदीच्छा भेट दिली असता पेडगावच्या गडकिल्ले विकासा बाबत बोलणे झाले. समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गडदुर्ग संवर्धन सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सातारचे मनोजकुमार भोसले साहेब उपास्थित होते.
याप्रसंगी अ. नगर जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी संघटन बांधणी व विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेत प्रामुख्याने मौजे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडाच्या विकासा बाबत सविस्तर चर्चा झाली. लवकरात लवकर पेडगाव ग्रामपंचायतने गाव परिसर व किल्ले विकास आराखडा तयार करावा. संबंधित आराखडा राष्ट्रवादी प्रदेश नेते दिपकराजे शिर्के साहेब व आम्ही उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेबांकडे देऊ असे शेलार यांनी बोलताना सांगितले. दरम्यान शेलार व भोसले यांचा पेडगाव येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात राजेशिर्के परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गडकिल्ले संवर्धक श्री.लक्ष्मीकांत राजे शिर्के, राष्ट्रवादी तालुका नेते व मा. सरपंच पै. देवीदास काका राजे शिर्के, श्री. कांतीलाल भाऊ खेडकर, उपसरपंच अशोक गोधडे, ग्रामपंचायत सदस्य रामहरी ढगे, सोसायटी सचिव गोरक्ष कदम, सुभाष खळदकर, शरद पवार, महेश मुळे, यशराजे शिर्के, सचिन कोक आदी उपास्थित होते.