पिंपरी I झुंज न्यूज : ८० व्या नामांकित पाचगणी सातारा व्यायामत मंडळ कृत खास निमंत्रित १२ महिला कबड्डी संघांना प्रथम साखळी, नंतर बाद पद्धतीत खेळण्यासाठी ५/१/२०२४ ते ७/१/२०२४ दरम्यान निमंत्रित करण्यात आले होते. त्यात क्रीडा कला विकास प्रकल्प मनपा कबड्डी संघास खास निमंत्रित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत खुल्या व्यावसायिक महिला राज्यस्तर नामांकित कबड्डी स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी पिंपरी चिंचवड मनपाच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने तृतीय क्रमांक मिळवत मनपाचा राज्यभर नावलौकिक वाढविला आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा. आमदार मकरंद आबा पाटील ,वाई मतदार संघ यांचे शुभ हस्ते व श्री सचिन भोसले सी .ओ. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, श्री संतोष अमराळे ,श्री शेखर भिलारे ,श्री तानाजी भिलारे, श्री. नारायण धनवडे यांचे उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धा श्री पठाण फिरोज स्पर्धा प्रमुख यांच्या नियंत्रणाखाली उत्कृष्टपणे पार पाडल्या.
पिंपरी चिंचवड मनपाच्या कबड्डी संघाने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल श्री मिनीनाथ दंडवते उपायुक्त क्रीडा, श्रीमती अनिताताई केदारी क्रीडा अधिकारी, श्री परशुराम वाघमोडे प्रशासनाधिकारी, श्री दत्तात्रेय झिंजुर्डे सर कार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री दीपक कन्हेरे क्रीडा पर्यवेक्षक,श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव यांनी विशेष अभिनंदन करीत कौतुक केले आहे.
या संघाला बन्सी आटवे क्रीडा पर्यवेक्षक व सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले आहे.