पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी येथील मा.नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र क्रीडांगण पिंपरी येथे उत्साहात पार पडला.
पिंपरी करंडक २०२३ स्पर्धेमध्ये कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठीचे १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक संदीप कापसे युवा मंच संघ पिंपरी यांनी पटकावले, कै. सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठीचे १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक व चषक सचिनदादा सानप क्रिकेट क्लब रुपीनगर, कै.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठीचे ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक झुंजार क्रिकेट क्लब पिंपरी तसेच कै .रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देहूरोड चॅलेंजर संघ यांना देण्यात आले.
तसेच ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी ( ४० + ) कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक रहीम इलेव्हन क्रिकेट क्लबसन मुंढवा यांनी पटकावले तसेच कै. संतोष नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक संविधान ग्रुप दापोडी, कै. राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक कोथरूड ट्रकर्स कोथरूड तसेच कै.सचिन जाधव व सोमनाथ रहाणे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी १० हजार रुपये रोख पारितोषिक व चषक एम.सी,सी. संडे इलेव्हन संघ मोरवाडी कासारवाडी यांना देण्यात आले.
यावेळी खेळाडूंशी संपर्क साधताना वाघेरे म्हणाले कि, स्पर्धा म्हणजे कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार… मैदानी खेळ खेळल्यामुळे सगळ्यात चांगला फायदा हा होतो की तुम्हाला चांगले मित्र मिळतात, चांगलं आरोग्य मिळत, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास होतो, तुमचं शरीर चांगलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही डिप्रेशन मध्ये कधीच जात नाही… त्यामुळे मैदानी खेळ हे 100% खेळलेच पाहिजेत. चालताना आपण ज्यावेळेस उजवा पाऊल पुढे टाकतो त्याला पुढे जाण्याचा अभिमान नसतो आणि त्याच वेळी डाव पाऊल मागे असतं त्याला मागे असनाचं कधी कमीपणा नसतो, कारण थोड्या वेळात परत चित्र बदलतं त्यामुळे निश्चित आज जे काही विजेते झालेले असतील त्यांचं पुढचं पाऊल असेल जे विजेते होऊ शकले नाहीत त्यांचा मागचं पाऊल असू शकतं. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा हे चित्र बदलेल, त्यामुळे हा खेळ आहे तुम्ही सगळेजण स्पर्धा म्हणून या ठिकाणी खेळलात त्याबद्दल सर्वांचेच मनापासून मी सर्व खेळांडूचे अभिनंदन करतो.
बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्त खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे,राजू बनसोडे, संदीप वाघेरे संतोष कुदळे,सेवानिवृत्त ए.सी.पी.नंदकिशोर भोसले पाटील,अॅड.अनंत रणदिवे,पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे,उद्योजक नंदकुमार बलकवडे,संतोष हांडे,प्रवीण कुदळे शेखर अहिरराव,वस्ताद दत्तोबा नाणेकर, नारायण वाघेरे उपस्थित होते तसेच बक्षीस वितरण सोहळ्याचे व स्पर्धेचे नियोजन संदीप नाणेकर, राजेंद्र वाघेरे,राघवेंद्र भांडगे,कैलास वाघेरे,गणेश मंजाळ, हरीश वाघेरे,श्रीकांत वाघेरे यांनी केले.