“गाना गाओ जिंदगी सजाओ व प्रेस क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
खामगाव I झुंज न्यूज : “गाना गाओ जिंदगी सजाओ व प्रेस क्लब खामगाव र.जि. क्र. 329/19 एफ 18432 च्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त ५ जानेवारी २०२४ रोजी जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिर (केला हिंदी हायस्कूलच्या मागे) येथे सकाळी १० वाजता केले आहे.
बुलढाणा जिल्हास्तरीय कराओके गायन महोत्सवाचे (कराओके गीत गायन स्पर्धा) आयोजन करण्यात आले आहे. तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दि. 30 डिसेंबर 23 या कालावधीत आपले नाव, पत्ता व वय नोंदवावे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी एंट्री फीस 200 रुपए असुन प्रथम पारितोषिक 5001₹, द्वितीय पारितोषिक 3001₹ आणि तृतीय पारितोषिक 2001₹ आहे. तसेच १७ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी खुला वर्ग आहे. ज्याची एंट्री फीस 300 रुपए असुन ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 5001₹, द्वितीय पारितोषिक 3001₹ आणि तृतीय पारितोषिक 2001₹ देण्यात येईल.
कार्यक्रमाला ‘झी युवा टीव्हीचा युवा सिंगर एक नंबर’ सिंगिंग रिॲलिटी शो चे महाविजेते, ‘स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा… महाराष्ट्रचा’ चे फायनालिस्ट लोककलावंत शाहीर विक्रांतसिंह सज्जनसिंह राजपूत, सुप्रसिद्ध गायिका प्रज्ञा धांडे तथा सुप्रसिद्ध गायक सप्त खंजेरी वादक प्रबोधन सम्राट सत्यपाल महाराजांचे पुतणे पियूष पाल चिंचोळकर हे प्रमुख जजेस म्हणून लाभणार आहेत.
“सहभागींना कराओके गाणी गाण्यासाठी 3 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. तज्ञ परीक्षकांद्वारे चाचणी केल्यानंतर, विजेत्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील आणि ६ जानेवारी २४ रोजी आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील. इच्छुकांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्रद्धा सिसोदिया : 9370444901 (फक्त महिलांसाठी), संतोष गवई : ९८५०३६१६६१ (फक्त पुरुषांसाठी) तरी इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.