जागृत नागरिक महासंघाच्या पाठपुराव्याला यश
चिंचवड I झुंज न्यूज : जागृत नागरिक महासंघाच्या पाठपुराव्यानंतर कृष्णा नगर संविधान चौक भागामध्ये असलेले धोकादायक व अमानांकित स्पीड ब्रेकर मनपाने काढले आहे.
कृष्णा नगर संविधान चौक भागामध्ये पिंपरी चिंचवड मनपाने रस्त्याचे सिमेंटीकरण केले होते. या ठिकाणी मनपातर्फे स्पीड ब्रेकर बनवले होते. सदरचे स्पीड ब्रेकर इतके भयंकर होते की गाडीचे बोनेट घासत होते शिवाय स्पीड ब्रेकर वरून जाताना वाहन चालकांना शारीरिकी त्रास होत होता.
जागृत नागरिक महासंघाने हि बाब ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर काळे यांनी तात्काळ निर्णय घेऊन सदरचे स्पीड ब्रेकर काढण्याचे आदेश दिले होते.