हिंजवडी | झुंज न्यूज : पिपरी – चिंचवड शहरातून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ” झिरो टॉलरन्स ” मोहीम अंतर्गत गुन्हे शाखा युनिट -४ कडून हिंजवडी मधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर छापा घालण्य्त आला. यावेळी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेतला जाणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली.
पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई करण्यात आली. गणेश कैलास पवार (वय -२० वर्षे , धंदा- नोकरी , सद्या रा – हॉटेल ग्रॅन्ड मन्नत , येळवंडे वस्ती , हिंजवडी , पुणे), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद , युसुफ सरदार शेख , हिरा या आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मागील ७-८ दिवसापासुन हिंजवडी येथील एका लॉज मध्ये पिडीत मुलींकडुन जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत होते . यासाठी आरोपी यांनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉटसअॅप नंबर प्रसारित केले होते. सदर क्रमांकावर संपर्क केल्यावर ते पिडीत तरुणींचे फोटो पाठवायचे व त्याठिकाणी सौदा झाल्यावर ग्राहकास हॉटेलचा पत्ता देत होते.”
पीडित ०४ तरुणीची पोलिसांनी सुटका केली असून संरक्षणकामी रेस्क्यु फौंडेशन, संरक्षण गृह , मोहम्मदवाडी , पुणे येथे ठेवले आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत