टाकळी भीमा येथील पालखी सोहळ्याचे बुधवारी होणार प्रस्थान
शिरूर I झुंज न्यूज : श्री क्षेत्र टाकळी भीमा येथील योगीराज महाराज पालखी सोहळ्याचा कार्तिकी वारीचा बैलजोडीचा मान शंकरराव करपे पाटील, योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील, टाकळी भिमाचे पोलीस पाटील प्रकाश करपे, माजी चेअरमन अशोकराव करपे यांच्या पंजाब तुफान बैल जोडीला मिळालेला आहे.
हा मान मिळाल्यानंतर पालखी सोहळ्याच्या बैलजोडीची विधिवत पूजन करपे पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील तात्या वडघुले, माजी सरपंच रामचंद्र शिवले, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक शिवाजी वडघुले, मेजर रामदास दोरगे, विश्वास साकोरे, पांडुरंग ढोरे ,अशोकराव करपे, विठ्ठल वडघुले, किसन पाटोळे, संपत वडघुले, दत्तात्रय घोलप, सुनील जाधव, सतीश घोलप, कोंडीबा दोरगे, उमेश काळे, विलास मापारे, साहेबराव काळे, विलास वडघुले विलास घोलप, लहू संकपाळ, महेंद्र वडघुले ,हरिदास साकोरे, बापू गवारे, प्रभाकर करपे, सोमनाथ ढवळे, सर्जेराव वडघुले, दत्तात्रय वडघुले. विक्रम वडघुले, पांडुरंग काळे, बाळासो काळे गोरक्ष काळे बिबीशन कांबळे, बापू गवारे, यांसह ग्रामस्थ व वारकरी मंडळीं उपस्थित होते.