पिंपरी I झुंज न्यूज : हिंदु धर्मात तुळशी विवाहला धार्मिक महत्व आहे. तुळशी मातेसोबात भगवान विष्णूच्या शालीग्राम आवताराचा या दिवशी विवाह केला जातो. तुळशी विवाह नंतर हिंदु धर्मीय लग्न समारंभ सुरु होतात. शहरात विविध ठिकाणी तुळशी विवाह मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
ओम गणेश होौ. सोसा.काकडे टाऊन शिप केशवनगर चिंचवड मध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यात मोठ्या प्रमाणात नागरिक तुळशी सह सहभागी झाले. सर्व विधिवत पूजन करून हा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात जल्लोषात पार पडला.
यात महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येनी होती. सर्वात जास्त मंगल अष्टके महिलांनी बोली व जास्तीत जास्त महिला एकत्र येऊन तुळशी विवाहची अत्यंत उत्तम पूजा मांडणी व इतर सजावट केली होती. महिलांना पुरुषांनी श्यक्य तेवढी मदत केली.
सोसायटी अध्यक्ष, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे, खजिनदार अजित नाईक यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे स्वागत केले. आपर्णा राजहंस, रोहिणी बच्चे, अश्विनी नाईक ,गीता कोरे ,पुष्करणी देशपांडे, सुषमा निंबाळकर, सारीका जोशी, स्वाती विटुळे, वर्षा सोनार काकू, स्मिता सावंत, काजल बच्चे – गावडे, अश्विनी कलशेट्टी, मोनिका धर्माधिकारी, मोघे काकू आदी महिलांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
राजू कोरे, सुहास राजहंस, दीपक सावंत, मनोज जोशी, गोविंद देशपांडे, सागर धर्माधिकारी,अभिजित देशपांडे, आदिनी यात सक्रिय सहभाग घेतला. महाप्रासद वाटप करून आलेल्या सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.