चांगभलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर थोरात यांचा पुढाकार
पिंपरी I झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्णानगर येथे आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चांगभलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर थोरात यांच्या पुढाकाराने क्रांतीनाना माळेगावकर प्रस्तूत ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परिसरातील महिलांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्कूटी ठेवण्यात आले होते. तसेच, स्पर्धेतील अन्य विजेत्यांना मानाची पैठणी देण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर आणि जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कातकर, महादेव कवितके, दिनेश यादव, पोपट हजारे, सुधाकर धुरी, गोकूळ धपाटे, अरुण पाडुळे, सुरज थोरात, तुषार नरुटे, सुरज महाराज लवटे, चंद्रकांत कोकाटे आदी उपस्थित होते.
जाधववाडीतही रंगला कार्यक्रम…
दरम्यान, जाधववाडी येथील साईकुंज सोसायटी, हिरवन, विठ्ठल एम्पायर फेज- 1, 2 येथे माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने आकाश फल्ले प्रस्तूत ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांक फ्रिज, द्वितीय गॅस शेगडी, मिस्कर टेबल फॅन यासह मानाची पैठणी आणि भेटवस्तू अशी बक्षीसे देण्यात आली. यावेळी उद्योजक निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव, सोनम जांभूळकर, ॲड. महेश लोहारे आदी उपस्थित होते.