पिंपरी I झुंज न्यूज : इन्फिनिटी रेडिओ, 90.4 FM वर दिवाळी विशेष कार्यक्रमांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी संगीत विभाग प्रस्तुत “स्वरगंध” ही जुन्या, नव्या, मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रंगविली.
यामध्ये सहभाग घेतला होता, साईनारायण स्वामी,सिद्धार्थ वैद्य, आशुतोष चाटी, सुजल पाठक, दुर्गा सुतार, ज्ञानेश्वरी कचगावंडे, स्नेहा आढळराव, अंजली तोगरे, स्टेफीअमलराज या महाविद्यालयाच्या युवा गायक, वादक कलाकारांनी. संगीत संयोजन होते.
संगीत विभाग प्रमुख प्रा.अनिता सुळे यांचे, विद्यार्थ्यांच्या या सुरेल मैफिलीचे, महाविद्यालय संस्थेच्या वतीने युनिटेक सोसायटी संस्थेचे सचिव डॉ.सोमनाथ पाटील, सीईओ डॉ. अविनाश ठाकूर,प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, उपप्राचार्य डॉ. किशोर निकम,प्रा.जयवंत बाबर,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
RJ माधुरी ढमाले, इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM यांनी विद्यार्थ्यांना संधी दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.