थेरगाव I झुंज न्यूज : पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून थेरगाव मधील शिवशक्ती सोशल फाउंडेशन संचलित स्पंदन बाल आश्रम या ठिकाणी गरजू तसेच अनाथ मुला मुलींना शाळेच्या 25 बॅगा आणि दिवाळी फराळाच्या स्वरूपात मदत करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी संवाद साधला .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्रमाच्या संचालकांनी पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या मार्फत केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. आणि मनभरून कौतुक केले.
स्पंदन बाल आश्रम चे संस्थापक मनोज भिमराव म्हसे सर यांनी व तेथील सर्व संचालक मंडळांनी उपस्थित पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या सदस्यांचे आणि सहकार्य केलेल्या सर्व कामगार बंधूंचे मनापासून आभार मानले.